विशेष प्रतिनिधी
गाझियाबाद – कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अमेरिकेतील भारतीयांनी पाठिंबा द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कार्यक्रमात यासंदर्भात आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केले.Tikait request Indians in US for demonstrations
पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे निमित्त साधून राकेश टिकैत यांनी अमेरिकी-भारतीयांना शेतकरी आंदोलनाला पाठिंब्याचे आवाहन केले आहे. एका व्हिडिओद्वारे दिलेल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे,
की गेल्या जवळपास वर्षापासून ऊन, वारा, पावसाची तमा न करता शेतकरी तीन कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत आहेत. त्यामुळे, पंतप्रधान मोदी यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमादिवशी अमेरिकेतील भारतीयांनी आपल्या वाहनावर शेतकऱ्यांचा ध्वज लावावा.
त्याचप्रमाणे, ‘शेतकरी नाही, अन्न नाही’ घोषणेचे फलकही लावावेत. निषेध नोंदवून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा. राकेश टिकैत यांनी ट्विट करून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात मोदी यांच्याशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App