Pakistan जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० पुनर्स्थापित करण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान सरकार आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचे एकमत आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आहे. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. Pakistan
Donald Trump : मोदींचा अमेरिकेतही जलवा; डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचारादरम्यान म्हणाले…
एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडी जिंकेल आणि ही आघाडी जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करेल. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने सरकार आल्यावर कलम 370 आणि 35 (A) पुनर्स्थापित करण्याचे आश्वासन दिले आहे. पाकिस्तान या प्रकरणी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सशी सहमत आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या भूमिकेला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. Pakistan
नॅशनल कॉन्फरन्सने सत्तेत आल्यानंतर कलम 370 पुनर्स्थापित करू, अशी शपथ घेतली आहे. मात्र, काँग्रेसने याबाबत मौन बाळगले आहे. असा उल्लेख त्यांनी जाहीरनाम्यातही केलेला नाही. कलम 370 ची पुनर्स्थापना काश्मिरी लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेली आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीने त्यांच्या जाहीरनाम्यात पुनर्स्थापनेला प्रमुख स्थान दिले आहे. Pakistan
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more