पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचा पुतळा बॉम्बने उडवला, ग्वादरमध्ये बलुच बंडखोरांचे कृत्य

Pakistan founder Mohammad Ali Jinnah statue destroyed in blast in Balochistan Gwadar

Mohammad Ali Jinnah statue destroyed in blast in Balochistan : बलुचिस्तानच्या बंडखोरांनी बलुचिस्तान प्रांतातील किनारी शहर ग्वादरमध्ये बॉम्बस्फोट घडवून पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा पुतळा नष्ट केला. सोमवारी ‘डॉन’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सुरक्षित क्षेत्र समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्हवर जूनमध्ये उभारण्यात आलेला पुतळा रविवारी सकाळी स्फोटकांनी उडवण्यात आला. Pakistan founder Mohammad Ali Jinnah statue destroyed in blast in Balochistan Gwadar


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : बलुचिस्तानच्या बंडखोरांनी बलुचिस्तान प्रांतातील किनारी शहर ग्वादरमध्ये बॉम्बस्फोट घडवून पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा पुतळा नष्ट केला. सोमवारी ‘डॉन’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सुरक्षित क्षेत्र समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्हवर जूनमध्ये उभारण्यात आलेला पुतळा रविवारी सकाळी स्फोटकांनी उडवण्यात आला.

रिपोर्ट्सनुसार, स्फोटात पुतळा पूर्णपणे नष्ट झाला. बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, प्रतिबंधित संघटना बलूच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ते बबगर बलूच यांनी ट्विटरवर स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. बीबीसी उर्दूने ग्वादरचे उपायुक्त मेजर (निवृत्त) अब्दुल कबीर खान यांच्या हवाल्याने सांगितले की, या प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी केली जात आहे. ते म्हणाले की, स्फोटके लावून जिनांचा पुतळा उद्ध्वस्त करणारे दहशतवादी या भागात पर्यटक म्हणून घुसले होते.

सीनेटर बुगती यांची दोषींवर कडक कारवाईची मागणी

अब्दुल कबीर खान यांच्या मते, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, पण तपास एक -दोन दिवसात पूर्ण होईल. ते म्हणाले, ‘आम्ही या प्रकरणाकडे सर्व बाजूंनी पाहत आहोत. दोषी लवकरच पकडले जातील.’ बलुचिस्तानचे माजी गृहमंत्री आणि सध्याचे सिनेटर सरफराज बुगती यांनी ट्विट केले, ‘ग्वादरमध्ये कायदे-ए-आझमचा पुतळा नष्ट करणे हा पाकिस्तानच्या विचारधारेवर हल्ला आहे. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की जियारत येथील कायदे-ए-आझम निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी आम्ही ज्याप्रमाणे गुन्हेगारांना शिक्षा केली त्याप्रमाणे त्यांना शिक्षा करावी.”

Pakistan founder Mohammad Ali Jinnah statue destroyed in blast in Balochistan Gwadar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात