विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांवर दोन प्रतिपिंडांचा उपचार करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. New stratergy for corona patiants sugested by WHO
रुग्णालयात दाखल होणारे व अति जोखीम असलेल्या रुग्णांना दोन प्रतिपिंडांचा उपचार केला पाहिजे, असे नमूद करीत ‘डब्लूएचओ ने ‘कॅसिरीव्हीमॅब’ आणि ‘इम्डेव्हीमॅब’ यांच्या एकत्रित उपचाराची शिफारस केली आहे. पहिल्या गटात गंभीर नसलेले पण रुग्णालयात दाखल करण्याचा धोका असलेले व तर अतिगंभीर आणि नाजूक स्थितीतील कोरोना रुग्ण जे सिरोनिगेटिव्ह म्हणजेच कोरोना संसर्गावर स्वतःमध्ये प्रतिपिंड तयार करण्याची क्षमता नसलेले रुग्ण दुसऱ्या गटात येतात.
कॅसिरीव्हीमॅब’ आणि ‘इम्डेव्हीमॅब’मुळे लस न घेतलेले, वृद्ध व रोगप्रतिकारक कोरोना रुग्णांचा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी होतो आणि लक्षणांचा अवधी कमी करता येऊ शकतो. दुसरी शिफारस ही अन्य एका चाचणीतील माहितीवर आधारित आहे. दोन प्रतिपिंडांच्या उपचारामुळे ‘सिरोनिगेटिव्ह’ रुग्णांमधील मृत्यूदर व यांत्रिक जीवरक्षक प्रणालीची गरज कमी होते. कॅसिरीव्हीमॅब’ आणि ‘इम्डेव्हीमॅब’ यांच्या एकत्रित उपचारांमुळे गंभीर आजारी एक हजार रुग्णांमध्ये ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अति गंभीर आजारी रुग्णांमध्ये ८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App