विशेष प्रतिनिधी
शांघाय : कोरोनास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचे काही रुग्ण पहिल्या अधिकृत केसच्या काही आठवडे आधीच अमेरिकेत मिळाल्याच्या अहवालावरून चीनने अमेरिकेवर आगपाखड केली आहे. अमेरिकेकडील जैवअस्त्रांशी संबंधित सर्व वस्तूंची तपासणी व्हायला हवी अशी मागणीही चीनने केली आहेNow China targets USA for corona issue
चीनी मुख्य साथरोगतज्ज्ञ असलेले गुआंग म्हणाले की, कोरोनाच्या उगमाचा शोध घेण्यासाठी आता अमेरिकेकडे लक्ष वळवायला हवे. साथीच्या प्रारंभीच्या काळात लोकांच्या चाचण्या करण्याबाबत त्यांचे धोरण संथ होते. तेथे अनेक जैविक प्रयोगशाळा आहेत.
२०१९च्या अखेरीस वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. एका अभ्यास अहवालानुसार युरोपमध्ये त्याआधी म्हणजे सप्टेंबरमध्येच या विषाणूचा फैलाव होत असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली. हे अहवाल तयार करणाऱ्या संशोधकांनी चीनकडे केले बोट मात्र मागे घेतलेले नाही.
विषाणू आधी इतरत्र होता म्हणजे त्याचा उगम चीनमध्ये झाला नाही असे म्हणता येणार नाही, असेही संशोधकांनी आवर्जून नमूद केले. पण चीनने अमेरेकिचे नाव येताच टीका करण्याची संधी साधली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App