वृत्तसंस्था
इस्लामाबाद /कोलंबो : भारताचे शेजारी दोन देश अस्थिरतेच्या गर्तेत सापडले आहे अर्थात या दोन्ही देशांच्या राजकीय समस्या वेगवेगळ्या आहेत. पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेरच्या बॉल पर्यंत बाजू लढवून धरत राजकीय बाउन्सर टाकून संसद नॅशनल असेंब्ली बरखास्त करून टाकली. आता बरखास्त केलेल्या नॅशनल असेंब्ली वर विरोधी पक्षांनी कब्जा करत शहाबाज शरीफ यांच्या रुपाने नव्या पंतप्रधानांची घोषणा करून टाकली.Neighbors in Crisis: India’s Neighboring Pakistan – Sri Lanka in the Pit of Instability; Imran aggressive but Rajpakshe resigns
तर दुसरीकडे श्रीलंका चीनच्या कर्जाखाली संपूर्ण दबून जाऊन आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने प्रवास करत असताना पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा देऊन टाकला आहे. देशात राजकीय स्थैर्य आणण्यासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांच्या सूत्रांनी सांगितले आहे.
रशिया – युक्रेन युद्धाचे सावट
एकीकडे रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरू असताना संपूर्ण जगाची वाटचाल एका आर्थिक स्थैर्याकडे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या दोन शेजारी देशांमधील राजकीय आणि आर्थिक पेचप्रसंग अधिक चिंताजनक बनले आहेत.
पाकिस्तानात मार्शल लॉ चा धोका
पाकिस्तान इम्रान खान यांच्या आक्रमक राजकारणामुळे विरोधक तसेच संतप्त झाले आहेत. तसेच पाकिस्तानात नागरी पक्षांमधील राजकीय घमासानातून मध्येच मार्शल लॉ अर्थात लष्करी राजवट लागू होण्याचा धोकाही उत्पन्न झाला आहे. लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा हे अचानक देशात पाकिस्तानात लष्करी राजवट लागू झाल्याची घोषणा करू शकतात, अशी भीती अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांना वाटत आहे.
अति महागाईने श्रीलंका होरपळली
श्रीलंकेत प्रचंड महागाई आणि टंचाई यामुळे जनता रस्त्यावर आली आहे. अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांनी आणीबाणी लागू केली असली तरी जनता आणि देश असंतोषाच्या ज्वालामुखी वर उभी आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या सरकारच्या हातात कोणतेही नियंत्रण उरले नसताना पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा देऊन आपला हात मोकळा करून घेतल्याचे मानले जात आहे.
आर्थिक पेचप्रसंग गहिरा
श्रीलंकेतला राजकीय पेचप्रसंग पेक्षाही आर्थिक पेचप्रसंग अधिक गहिरा आणि गंभीर आहे. पेट्रोल पेक्षा दूध महाग झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे साठे संपले आहेत आणि जनता दोन वेळच्या अन्नासाठी देखील महाग झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची राजकीय स्थैर्य मिळेल की संपूर्ण श्रीलंका आर्थिक संकटात बरोबर राजकीय संकटात देखील पोहोचेल याविषयी शंका व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App