विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातल्या भाषणाचे दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ उजाडली तरी लळित संपेना. ज्यांचे हाताच्या बोटावर मोजण्या इतपतही नेते निवडून येत नाहीत, ते राज ठाकरे फक्त लेक्चर देतात असे टीकास्त्र शरद पवार यांनी सकाळी सोडले होते.Raj Thackeray: Raj Thackeray’s Gudipadva speech ends smoothly; Ajit Dada, Sujat Ambedkar also protested
परंतु ज्या राज ठाकरे यांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते देखील निवडून येत नाहीत, त्या राज ठाकरे यांच्या भाषणावर मात्र प्रतिक्रिया द्यायला डझनभर नेते पुढे आले. या प्रतिक्रियांचे लळित 24 तास उलटले तरी संपेना…!!दुपारनंतर त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बहुजन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांची भर पडली.
अजित दादांनी राज ठाकरे यांना नकलाकार असे संबोधले आहे. त्यांना नकला करण्याशिवाय दुसरे काही येत नाही. पहिल्या निवडणुकीत 13 आमदार निवडून आणलेले राज ठाकरे आता सरड्यासारखे रंग बदलतात. शरद पवारांची मुलाखत घेताना त्यांना शरद पवार जातीयवादी वाटले नाही पण आता मात्र जातीयवादी वाटताहेत. इतरांना नावे ठेवण्यापेक्षा राज ठाकरे यांनी आपणच निवडून आणलेले आमदार का सोडून जातात?, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे असा टोला अजितदादांनी इंदापूर आतून लगावला आहे.
हनुमान चालीसा अमित ठाकरेंना म्हणायला लावा
बहुजन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये उतरले असून त्यांनी पर्याय पहिल्यांदाच जाहीरपणे राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. हनुमान चालीसा लावण्याच्या तुमच्या भूमिकेला शंभर टक्के पाठिंबा आहे, पण तिथे हनुमान चालीसा म्हणायला एकही बहुजन मुलगा नको तर अमित ठाकरे यांना हनुमान चालीसा म्हणायला लावा, असे टीकास्त्र सुजात आंबेडकर यांनी सोडले आहे.
आज दिवसभर राज ठाकरे यांच्या भाषणावरच्या अशाच प्रतिक्रिया येत होत्या. यामध्ये शरद पवार यांच्यापासून किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेक नेत्यांचा समावेश होता. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांनी देखील राज ठाकरेंवर शरसंधान केले. मराठवाड्यातले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांचा मुस्लिम टोपी घातलेला फोटो शेअर करत हेच का यांचे हिंदुत्व?, सवाल केला,
तर एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंवर बोलायचे नाही, असे फर्मान एमआयएमच्या कार्यकर्त्यांना सोडल्याची माहिती खासदार इमतियाज जलील यांनी दिली. एकूण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक लोहार की हाणून घेतली. त्यावर विविध पक्षांच्या नेत्यांनी सौ सोनार की चालवली…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App