विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – मंगळाच्या पृष्ठभागावरून मातीचे नमुने गोळा करण्यात पर्सिव्हरन्स बग्गीला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था `नासा`ने मंगळाच्या अभ्यासासाठी पर्सिव्हरन्स बग्गी पाठविली आहे. त्यावर अनेक उपकरणे लावण्यात आली आहेत. त्याद्वारे विविध प्रयोगही करण्यात येणार आहेत. NASAs Rover fail to get samples from mars
`नासा`ने दिलेल्या माहितीनुसार जेजिरो क्रेटरजवळील नमुने गोळा करण्याचा प्रयत्न पुन्हा करण्यात येणार आहे. हे क्रेटर सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी तयार झाल्याचा अंदाज आहे. तेथे सूक्ष्म जीव आहेत का याचा तपास घेण्यात येत आहे. येथील मातीचे सुमारे २० नळ्या भरून नमुने घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रयोगांचाच एक भाग म्हणून मंगळाच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा करण्यात येणार आहेत.
नंतर हे नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पर्सिव्हरन्स बग्गीने गेल्या शुक्रवारी जमिनीचे नमुने गोळा करण्यासाठी खणण्यास सुरुवात केली होती. परंतु, नमुने गोळा करण्याच्या नळीमध्ये धूळ किंवा तेथील दगडाचे नमुने गोळा होऊ शकलेले नाहीत, अशी माहिती `नासा`ने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App