विशेष प्रतिनिधी
इम्फाळ : दहशतवाद्यांनी घात लावून वाहन उडविल्याने पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलासह लष्करी अधिकारी शहीद झाला. मणिपूरच्या सूरज चंद जिल्ह्यात शनिवारी घात लावून दहशतवादी हल्ला करण्यात आला. आसाम रायफल्समधील एका लष्करी अधिकाऱ्याचे संपूर्ण कुटुंब यामध्ये मृत्यूमुखी पडले. या हल्यात पाच सैनिकांचाही मृत्यू झाला.Military officers, along with his wife and eight-year-old son were killed in the attack
शनिवारी सकाळी १०.०० वाजल्याच्या सुमारास सूरज चंद जिल्ह्याच्या म्यानमार सीमेजवळ सिंगनगट उपखंडातील एस सेहकेन गावात ही घटना घडली. या भागातून लष्करी अधिकाºयांचा ताफ जात असताना आधीपासूनच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला.
कर्नल विप्लव त्रिपाठी त्यांची पत्नी अनुजा आणि आठ वर्षांचा मुलगा अबीर यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर तीन ‘क्विक रिअॅक्शन टीम’ (क्यूआरटी) सदस्यांचाही मृत्यू झाला. मणिपूरमधील गेल्या काही वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पिपल्स लिबरेशन फ्रंट आणि मणिपूर नागा पिपल्स फ्रंट या दहशतवादी संघटनांनी घेतली आहे. हा हल्ला आपणच केल्याचा दावा दोन्ही संघटनांनी केला आहे.
पीपल्स रिव्होल्यूशनरी पार्टी आॅफ कंगलीपक या दहशतवादी गटावरही संशय घेण्यात येत आहे. ह्यरिव्होल्यूशनरी पार्टी ऑफ कंगलीपकह्ण ही दहशतवादी संघटना स्वतंत्र मणिपूरच्या मागणीसाठी हिंसक कारवाया करते. ईशान्येकडील काही राज्यांप्रमाणे मणिपूरमध्येही अनेक दहशतवादी गट सक्रिय आहेत. एका दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात २०१५ मध्ये २० जवान शहीद झाले होते.
कर्नल विप्लव त्रिपाठी यांचे आजोबा किशोरीमोहन त्रिपाठी यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. ते छत्तीसगडचे आमदार होते. विप्लव १४ वर्षांचे असताना १९९४मध्ये किशोरीमोहन यांचे निधन झाले. त्यांच्या प्रेरणेनेच विप्लव यांनी लष्करी सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता, असे त्यांचे मामा राजेश पटनाईक यांनी सांगितले. विप्लव यांचे वडील रायपूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आसाम रायफल्सवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भ्याड आणि निषेधार्ह आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App