गड्या आपुला गाव बरा, दहशतवाद्यांच्या भितीने परप्रांतीय कामगार सोडू लागले काश्मीर


विशेष प्रतिनिधी

जम्मू,– दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या परप्रांतीय कामगारांना कुटुंबीयांसह काश्मीर खोरे सोडणे भाग पडत आहे. जम्मू आणि उधमपूर येथील रेल्वे तसेच बस स्थानकांवर अशा हजारो कामगारांची गर्दी झाली आहे. त्यांनी कुटुंबीयांसह तिकीट केंद्रांवर रांगा लावल्याचे दृश्य दिसत आहे.Migrated works left Kashmir due to terrorist

खबरदारीचा उपाय म्हणून तेथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. हे कामगार मुळ गावी आधीच परतण्यास अधीर झाले असून इतर अनेक जण परतीच्या मार्गावर आहेत. जम्मू रेल्वे स्थानकाबाहेर पाणी किंवा निवारा अशा मूलभूत सुविधा नसूनही रस्त्यावर शेकडो पुरुष, महिला आणि मुले थांबली आहेत.

काश्मीरात दर वर्षी तीन ते चार लाख स्थलांतरित कामगार येतात. यातील बहुतांश हिंदू असतात. ते प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि उत्तराखंडचे असतात. मार्च महिन्याच्या प्रारंभी कुशल आणि अकुशल कामे करण्यासाठी त्यांचे आगमन होते. पाषाणकाम, सुतारकाम, वेल्डिंग, शेती अशी कामे ते करतात. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरु होण्यापूर्वी ते परततात, मात्र यावेळी त्यांना ऑक्टोबरच्या मध्यासच परतणे भाग पडत आहे.

Migrated works left Kashmir due to terrorist

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात