जपानमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन विधेयक, स्कर्ट किंवा इतर कपड्यांमध्ये आक्षेपार्ह फोटो काढल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडाची तरतूद


वृत्तसंस्था

टोकियो : जपानमधील महिलांच्या सुरक्षेसाठी संसदेत नवे विधेयक मांडण्यात आले आहे. जर हे विधेयक मंजूर होऊन कायदा बनला, तर जपानमध्ये स्कर्ट किंवा इतर कपड्यांमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढल्याबद्दल दोषी आढळलेल्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो. जनतेच्या मागणीवरून हे विधेयक संसदेत आणण्यात आले आहे.Japan’s new bill for women’s safety imposes 3-year jail term, fines for taking offensive photos in skirts or other clothing

हे विधेयक आणण्यामागचा उद्देश अपस्कर्टिंगसारखे महिलांशी संबंधित गुन्हे रोखणे हा आहे. ब्रिटन आणि युरोपातील अनेक देशांनी याला यापूर्वीच बलात्काराच्या श्रेणीत टाकले आहे. यासाठी या देशांमध्ये शिक्षाही निश्चित करण्यात आली आहे.



अपस्कर्टिंग म्हणजे काय?

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक लहान कपड्यांमध्ये महिलांचे फोटो क्लिक करतात. मग ते एका पॉर्न वेबसाइटला विकतात किंवा रिव्हेंज पॉर्न अंतर्गत त्या महिलेची बदनामी करतात. या प्रकारच्या कृतीला अपस्कर्टिंग म्हणतात. जपानमध्ये आता त्याचा बलात्काराच्या श्रेणीत समावेश केला जात आहे. स्थानिक भाषेत म्हणजे जपानी भाषेत त्याला ‘चिकन’ म्हणतात.

‘जपान टुडे’च्या वृत्तानुसार असे गुन्हे गर्दीची सार्वजनिक ठिकाणे, चित्रपटगृहे आणि स्टेडियममध्ये अनेकदा घडतात. जपानमधील मेट्रो ट्रेनमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. येथे घाईघाईत महिलांना कपडे सांभाळता येत नसल्याने गुन्हेगारांच्या घाणेरड्या मानसिकतेला बळी पडतात.

विधेयकात काय आहे?

अपस्कर्टिंग रोखण्यासाठी विधेयकात कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. हे विधेयक पास होणार हे नक्की. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जामिनासाठी कडक अटी लागू राहतील. त्याची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्यानंतर त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.

त्यावर न्यायालयात सुनावणी केली जाईल. त्यात सर्व अहवाल सादर केले जातील. दोषी आढळल्यास किमान शिक्षा तीन वर्षे आणि 18 लाख रुपये दंड होऊ शकतो. दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल.

Japan’s new bill for women’s safety imposes 3-year jail term, fines for taking offensive photos in skirts or other clothing

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात