विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानात आता अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. यासंदर्भात संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानात भूकबळीची संख्या वाढू शकते, असा इशारा दिला आहे. अन्नाची गरज भागवण्यासाठी अफगाणिस्तानला तातडीने २० कोटी डॉलरची गरज आहे.Huge food crisis in Afghanistan
देशातील एक तृतीयांश लोकसंख्या आणीबाणीचा सामना करत आहेत किंवा त्यांच्या खाद्य सुरक्षेवर टांगती तलवार आहे. आता हिवाळा येत असून दुष्काळही पडलेला आहे. लोकांना भूकबळीपासून वाचवायचे असेल तर अफगाणिस्तानला पैशाची गरज भासणार आहे.
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत काही आठवड्यांपासून हजारो नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. परंतु अजूनही मोठी लोकसंख्या पुरेशा अन्नापासून वंचित राहत आहे. अफगणिस्तानाला आणखी निधी दिला नाही तर देशातील अन्न सप्टेंबरअखेरपर्यंत संपेल. गरजूंच्या खाद्यान्नाची गरज भागवण्यासाठी २० कोटी डॉलरची गरज आहे.
अफगाणिस्तानातून अमेरिका सैनिक परतल्यानंतर आता तालिबानकडून राज्य चालवले जात आहे. परंतु आर्थिक आघाडीवर कोणतेच नियोजन नसल्याने अफगाणिस्तानाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल, असे अनेक देशांचे मत आहे.
चार कोटी लोकसंख्या असलेल्या देशात दीड कोटी लोकांसमोर दोनवेळच्या अन्नाचे संकट उभे राहिले आहे. तीन वर्षात दुसऱ्यांदा दुष्काळ पडला आहे. तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागाला अगोदरपासूनच दुष्काळाच्या झळा बसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App