गाझाच्या अल-शिफा रुग्णालयातच ओलिसांना नागरिकांना आणले गेले होते, इस्रायलने जारी केला व्हिडीओ!

  • नेपाळी आणि थायलंडचे नागरीक ओलीस ठेल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम : इस्रायली सैन्याने रविवारी सुरक्षा कॅमेऱ्यांचे फुटेज जारी करत म्हटले आहे की, दक्षिण इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हमासच्या हल्ल्यात अपहरण करण्यात आलेल्या ओलिसांना गाझा येथील अल-शिफा रुग्णालयात आणले जात होते.Gazas Al Shifa hospital was the hostages brought to the citizens Israel released the video

प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये काही सशस्त्र लोक एका माणसाला स्ट्रेचरवर घेऊन जाताना दिसत आहेत. दुसर्‍या व्हिडिओ क्लिपमध्ये, एका व्यक्तीला हॉस्पिटलसारख्या इमारतीत जबरदस्तीने ओढल्याचा निषेध करताना दिसत आहे. मात्र वृत्तसंस्था एएफपी या फुटेजच्या सत्यतेची तत्काळ पुष्टी करू शकली नाही.



व्हिडिओ फुटेजमध्ये दिसते की हमासच्या हल्लेखोरांनी एका ओलिसाला ताब्यात घेतले आहे आणि ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत. लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हंगारी यांनी एका ब्रीफिंगमध्ये ही माहिती दिली. व्हिडीओमध्ये दिसत असलेले ओलीस नागरिक हे नेपाळ आणि थायलंड येथील होते.

आम्ही अद्याप या दोन नागरिकांचा शोध घेऊ शकलो नाहीत, ते सध्या कुठे आहेत याबाबत आम्हाला माहिती मिळालेली नाही. असंही हंगारी यांनी सांगितले.

इस्रायली अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हे फुटेज 7 ऑक्टोबर 2023 चे असल्याचे दिसते, ज्या दिवशी हमासच्या हल्लेखोरांनी दक्षिण इस्रायलमध्ये हल्ले केले. ज्यामध्ये सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि सुमारे 240 इतरांचे अपहरण करण्यात आले.

Gazas Al Shifa hospital was the hostages brought to the citizens Israel released the video

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात