Fugitive Baba Nithyananda : देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. दरम्यान, स्वघोषित धर्मगुरू स्वामी नित्यानंदने असा दावा केला आहे की, मी भारतात पाय ठेवताच कोरोना महामारी पूर्णपणे संपुष्टात येईल. वास्तविक, त्याने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक शिष्य नित्यानंदला विचारतो की, भारतातून कोरोना केव्हा जाईल? Fugitive Baba Nithyananda Claims That His Arrival In India Will end Corona pandemic
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. दरम्यान, स्वघोषित धर्मगुरू स्वामी नित्यानंदने असा दावा केला आहे की, मी भारतात पाय ठेवताच कोरोना महामारी पूर्णपणे संपुष्टात येईल. वास्तविक, त्याने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक शिष्य नित्यानंदला विचारतो की, भारतातून कोरोना केव्हा जाईल?
त्याला उत्तर देताना नित्यानंद म्हणाला की, देवीने आपल्या आध्यात्मिक शरीरात प्रवेश केला आहे आणि जेव्हा मी भारतीय भूमीवर पाऊल ठेवेल तेव्हाच तो (साथीचा रोग) सर्व देश सोडून जाईल.
सन 2019 पासून नित्यानंद इक्वाडोरच्या किनाऱ्यावरील बेटावर दडून बसला होता. त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. आरोपानंतर नित्यानंदने भारतातून पळ काढला. तेव्हापासून तो संयुक्त राष्ट्राकडे ‘कैलासा’ला स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्याची मागणी करत आहेत.
यापूर्वी कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन त्याने भारतीयांना ‘कैलासा’वर येण्यास बंदी घातली होती. एका निवेदनात नित्यानंद म्हणाला होता की, माझ्या भारतीय भक्तांना या बेटाच्या देशात प्रवेश करता येणार नाही.
नित्यानंदने आपल्या कार्यकारी आदेशात म्हटले होते की, केवळ भारतीयच नव्हे, तर ब्राझील, युरोपियन युनियन आणि मलेशियामधील लोकांनाही कैलासामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला.
Fugitive Baba Nithyananda Claims That His Arrival In India Will end Corona pandemic
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App