मायक्रोसॉफ्टचे संपादक बिल गेटस आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे उदाहरण देऊन प्रसिध्द उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विट केले आहे. ऐवढाही पैसा कमावू नका की बायकोला नवऱ्यापेक्षा पोटगीचे आकर्षण अधिक वाटेल, असे त्यांनी म्हटले आहे. गोयंका यांचे हे ट्विट स्त्रीद्वेष्टे असल्यची टीका होत आहे. Don’t make so much money that wife is more attracted to alimony than husband, Harsh Goenka’s tweet criticizes being misogynistic
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे संपादक बिल गेटस आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे उदाहरण देऊन प्रसिध्द उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विट केले आहे. ऐवढाही पैसा कमावू नका की बायकोला नवऱ्यापेक्षा पोटगीचे आकर्षण अधिक वाटेल, असे त्यांनी म्हटले आहे. गोयंका यांचे हे ट्विट स्त्रीद्वेष्टे असल्यची टीका होत आहे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांनी नुकताच घटस्फोट घेतला. त्यापूर्वी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचाही घटस्फोट झाला होता. दोघांच्याही घटस्फोटांमुळे त्यांच्या पत्नीला अब्जावधी रुपयांची भरपाई मिळाली आहे. हे दोघेही जगातील पहिल्या पाच क्रमांकाच्या श्रीमंतांपैकी एक ओळखले जातात.
हाच संदर्भ देताना आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष आणि प्रसिध्द उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की बिल गेटस यांचा घटस्फोट झाला. यातून एक शिकवण मिळते की इतकाही पैसा कमावू नका की बायकोला नवऱ्यापेक्षा घटस्फोट झाल्यावर मिळणाऱ्या पोटगीचे आकर्षण जास्त वाटेल. त्यामुळे स्वत:वर खर्च करण्यास कचरू नका.
गोयंका यांनी हे ट्विट गंमतीने केले असले तरी त्यांच्यावर खूप टीका होत आहे. गोयंका यांचे ट्विट स्त्रीद्वेष्टे आहे. महिलांप्रति द्वेषमूलक आहे. एका ६३ वर्षीय प्रतिष्ठित उद्योजकाने असे ट्विट करणे अत्यंत दुर्दैवी आहे. महिला या केवळ पैशाच्या भुकेल्या नसतात. पुरुषांना केवळ पैशासाठी घटस्फोट कधीही दिली जात नाही. एखाद्या स्त्रीचा नवरा श्रीमंत असला म्हणजे तिचा पोटगीवरच डोळा असतो,असे म्हणणे चुकीचे आहे, अशी टीका अनेकांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App