वृत्तसंस्था
बीजिंग : China चीनचे संरक्षण मंत्री डोंग जुन हे चिनी लष्करातील भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत. यानंतर त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. फायनान्शिअल टाईम्सने 27 नोव्हेंबर रोजी दिलेल्या वृत्तानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांना या आरोपांमध्ये अडकवण्यात आले आहे.China
अहवालानुसार, भ्रष्टाचारामुळे चीनचे सैन्य कमकुवत होत असल्याची भीती चीनला वाटत आहे. त्यामुळे 2023 पासून चिनी लष्करात भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत नऊ पीएलए जनरल आणि अनेक अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
यापूर्वीही दोन संरक्षणमंत्र्यांवर असेच आरोप झाले होते
डोंग यांना 2023 मध्ये चीनचे संरक्षण मंत्री बनवण्यात आले. याआधी ली शांगफू हे चीनचे संरक्षण मंत्री होते. ली यांना पदभार स्वीकारल्यानंतर 7 महिन्यांनीच त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. 29 ऑगस्ट 2023 रोजी एका कार्यक्रमात भाषण दिल्यानंतर ते बेपत्ता होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांना संरक्षण मंत्री पदावरून हटवण्यात आले. कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणण्यानुसार, ली यांनी लष्करी उपकरणांच्या खरेदीत अनियमितता केली होती.
याआधी 2023 मध्ये वेई फेंगे यांचीही शिस्तभंगाच्या आरोपावरून कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. वेई यांच्यावर पक्षाचा विश्वास तोडणे, लष्कराची प्रतिष्ठा खराब करणे आणि प्रचंड लाच घेतल्याचा आरोप होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App