चीनच्या सरकारी टीव्ही चॅनेलने चीनची 38 च्या ऐवजी 42 सुवर्णपदके दाखवून पदक तालिकेत चीनला पहिल्या क्रमांकावर दाखवले. China messed up the medal table at the Tokyo Olympics 2020 ! How China overtook the United States to become number one
विशेष प्रतिनिधी
टोकियो : कोरोना महामारीमुळे एक वर्षाच्या विलंबाने झालेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. खेळांच्या या महाकुंभात अमेरिकेने 39 सुवर्णपदकांसह 113 पदके जिंकली आणि प्रथम क्रमांकावर कब्जा केला.
दुसरीकडे, चीन या यादीत 38 सुवर्ण आणि एकूण 88 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पण ट्विटरवर एक फोटो समोर आला ज्यामध्ये पदक तालिकेत चीन पहिल्या क्रमांकावर होता.
China doesn't lose! @andrewschulz @MsMelChen pic.twitter.com/NCFuneuY4g — Fernando Calderon (@fhcalderon87) August 11, 2021
China doesn't lose! @andrewschulz @MsMelChen pic.twitter.com/NCFuneuY4g
— Fernando Calderon (@fhcalderon87) August 11, 2021
या फोटोचे सत्य काय आहे, हे प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक असे घडले की, चीनच्या सरकारी टीव्ही चॅनेलने चीनच्या 38 च्या ऐवजी 42 सुवर्णपदके दाखवून पदक तालिकेत चीनला पहिल्या क्रमांकावर दाखवले.
ऑस्ट्रेलियन वेबसाईट Nine.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, चीनच्या सरकारी टीव्ही चॅनेल चायना सेंट्रल टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) ने 42 सुवर्णपदकांसह चीनला पहिल्या क्रमांकावर दाखवून टोकियो ऑलिम्पिकच्या पदकांच्या आकडेवारीत गडबड केली आहे. चीन 38 सुवर्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि अमेरिका 39 सुवर्णांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
या वृत्तानुसार चीनने तैवानचे 2 सुवर्ण, हाँगकाँग आणि मकाऊचे प्रत्येकी एक सुवर्ण मिळवून 42 सुवर्णपदके दाखवली. त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेने एकूण 113 पदके (39 सुवर्ण) जिंकून प्रथम क्रमांक पटकावला होता. त्याचवेळी 23 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत पहिल्या क्रमांकावर असलेला चीन शेवटच्या दिवशी अमेरिकेकडून पदक तक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर घसरला. चीनने या ऑलिम्पिकमध्ये 38 सुवर्णांसह एकूण 88 पदके जिंकली.
भारताबद्दल बोलायचे झाले तर टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी इतिहासातील सर्वोत्तम ऑलिम्पिक ठरली आहे. नीरज चोप्राच्या सुवर्णासह भारताने यावेळी 7 पदके जिंकली. यापूर्वी भारताने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 6 पदके जिंकली होती, ज्यात एकही सुवर्ण नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App