विशेष प्रतिनिधी
लंडन : लॉकडाऊनदरम्यान निबंर्धांचे उल्लंघन करून अनेक पार्ट्या केल्याचे प्रकरण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानंतर जॉन्सन हे पदाचा राजीनामा देणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.Britain’s Prime Minister Boris Johnson has to pay price of Partygate
कोरोना काळात लॉकडाउनच्या कालावधीत बोरीस जॉन्सन यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये पार्टी केली होती. याचे निमंत्रणही कर्मचाऱ्यांना पाठविले होते. कर्मचाºयांनी आपले मद्य स्वत: घेऊन यावे असे म्हटले होते. वरिष्ठ अधिकारी सू ग्रे यांनी जॉन्सन यांच्या पार्ट्यांप्रकरणी चौकशी केली होती. त्याच्या अहवालाची प्रत त्यांनी जॉन्सन यांना दिली.
पार्ट्यांप्रकरणी पोलिसांचा तपास प्रलंबित असल्याने अहवालातील निष्कर्ष जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, सोमवारनंतर स्वत: जॉन्सन निष्कर्षांबाबत माहिती देतील, असे त्यांच्या कार्यालयाने आश्वासन दिले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली २० पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते.
पार्ट्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले की नाही, याची चौकशी ग्रे यांनी केली. नियमांचे उल्लंघन करून पार्ट्या आयोजित केल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी असून काही कंझर्व्हेटिव खासदारांनी जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जॉन्सन यांनी मात्र राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
तेव्हापासून जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसून येत आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी जोर धरून आहे. या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले जॉन्सन आता राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना काळात लॉकडाउनच्या कालावधीत बोरीस जॉन्सन यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये पार्टी केली होती. तेव्हापासून जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसून येत आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी जोर धरून आहे. या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले जॉन्सन आता राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App