Bangladesh : बांगलादेशात 44 जिल्ह्यांत मंदिरांवर हल्ले, 2 हिंदू नेत्यांची हत्या; पंतप्रधानांनी देश सोडल्यानंतर अल्पसंख्याक दहशतीत

Bangladesh

वृत्तसंस्था

ढाका : बांगलादेश ( Bangladesh ) मागील एक आंदोलन आणि अराजकतेतून जात आहे. आधी आरक्षणाच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोदोलन आणि आता सोमवारी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरच्या हिंसाचारात आतापर्यंत ४४० लोकांचा मृत्यू झाला आहे. अशांततेमुळे बांगलादेशात राहणारे हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांशिवाय अहमदियासारखे अल्पसंख्या दहशतीत अाहेत. बांगलादेशच्या ६४ जिल्ह्यांपैकी ४४ जिल्ह्यांत हिंदू आणि बुद्धविहारांना निशाणा केले आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन ओक्य परिषदेचे सरचिटणीस राणा दासगुप्ता म्हणाले की, अनेक हिंदू आपली घरे सोडून जात आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस नाहीत. लष्कराने आपत्कालीन सेवेतील नंबर कार्यरत नाहीत. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेचे नेते काजोल देबनाथ यांनी सांगितले की, ईशान्य सिराजगंज आणि रंगपूरमध्ये दोन हिंदू नेत्यांची हत्या केली आहे. हे दोघे शेख हसीना यांच्या अवामी लीगचे बडे नेते होते. ढाक्याजवळ गावात लपून राहिलेला प्रतीक म्हणतो की, कसे कधीपर्यंत राहू हे कळत नाही.



नाहिद इस्लाम- ज्यांच्यापुढे सरकारही झुकले

बांगलादेशच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीना यांना हटवण्याचे श्रेय समाजशास्त्राचा विद्यार्थी नाहिद इस्लामला जाते. २६ वर्षीय इस्लाम सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा समन्वयक होता. ज्याचे नंतर हसीना हटाओ मोहिमेत रूपांतर झाले. 1998 मध्ये ढाका येथे जन्मलेल्या इस्लामचे लग्न झाले आहे. त्याचे वडील शिक्षक व आई गृहिणी आहे. हसीना यांच्या पक्ष अवामी लीगच्या विरोधात त्याने आवाज उठवला. 19 जुलै रोजी इस्लामचे 25 जणांनी अपहरण केले आणि २ दिवसांनी तो बेशुद्धावस्थेत सापडला.

खासदाराच्या शोधात हॉटेल पेटवले, २४ लोक जळाले

देशभरात पोलिसांनी सुमारे 450 स्थानकांवर हल्ला केला आणि अनेक पोलिस अधिकारी मारले गेले. ढाक्यात पोलिस मुख्यालय, 13 पोलिस ठाण्यात तोडफोड केली आणि आग लावली. शस्त्रे लुटली. पोलिसांच्या हत्येच्या विरोधात कर्मचारी संघटना आणि बांगलादेश पोलिस संघाने मंगळवारी संपाची घोषणा केली.
शेख हसीना सरकारचे ९ मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या घरांसह कमीत कमी २७ खासदारांवर हल्ला केला आणि घरे जाळली.
मंगळवारी कर्फ्यू उठवला गेला आणि शाळा आणि कार्यालये पुन्हा सुरू झाली तरीही, पोलिस किंवा आरएबी सदस्य कुठेही दिसले नाहीत. सचिवांनी सकाळी बांगलादेश सचिवालयात काम केले, परंतु दुपारी कार्यालय सोडले. त्यांना हल्ल्याची भीती वाटते.

बांगलादेशच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर देश सोडण्याची घाई सुरू आहे. एअर इंडियाने मंगळवारी सायंकाळपासून ढाका येथून सेवा सुरू केली. विस्तारा बुधवारपासून विमानसेवा सुरू करणार आहे.

Bangladesh, 2 Hindu leaders killed; After the Prime Minister left the country, minorities in terror

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात