मुलांच्या वाईट सवयी, आता पालकांना जबाबदार धरून करणार शिक्षा


विशेष प्रतिनिधी

शांघाय : मुलांच्या वाईट सवयी आणि गुन्ह्यांना आता पालकांच्या संस्काराला जबाबदार धरलं जाणार आहे. यासाठी पालकांना विशिष्ट प्रकारची शिक्षाही दिली जाणार आहे. चीन सरकारने याबाबत एक कायद्याचा मसुदा तयार केला आहे. लवकरच या प्रस्तावित विधेयकाला मंजूरी देऊन त्याचं कायद्यात रुपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.Bad habits of children, now parents will be held accountable and punished

या नव्या प्रस्तावित कायद्याप्रमाणे एखाद्या पालकांच्या पाल्यानं वाईट वर्तन केलं किंवा काही गुन्हा केला, तर याला पालकांच्या संगोपनाला जबाबदार धरलं जाणार आहे. पालकांनी योग्य वळण न लावल्यानं आणि योग्य काळजी न घेतल्यानंच त्या मुलानं ती चुकीची कृती किंवा गुन्हा केला असा अर्थ काढला जाणार आहे. तसेच यात दोषी सिद्ध झाल्यास संबंधित पालकांना चीनच्या शिक्षण मंत्रालयानं विकसित केलेल्या “कुटुंब शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमा”ला सामोरं जावं लागेल.



चीनच्या कायदा आयोगाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की किशोरवयातील मुलांनी चुकीचं वर्तन करायला खूप कारणं असतात. त्यात कुटुंबात योग्य संगोपन न करणं हे मोठं कारण आहे. पालकांनी आपल्या पाल्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि त्यांच्यासोबत आराम करणं, खेळणं आणि अभ्यास घेणं अशा कृती केल्या पाहिजे.

Bad habits of children, now parents will be held accountable and punished

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात