Afghanistan Crisis : तालिबानपुढे सरकारने गुडघे टेकले, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींनी अफगाणिस्तान सोडून काढला पळ

Afghanistan crisis President Ashraf Ghani has left the country, reports says

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात तालिबान युगाची पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान सरकारला तालिबानने नमवले आहे. टोलो न्यूजनुसार, देशाचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सत्ता हस्तांतरणानंतर देश सोडला आहे. ते ताजिकिस्तानला रवाना झाले आहेत. Afghanistan crisis President Ashraf Ghani has left the country, reports says


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानात तालिबान युगाची पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान सरकारला तालिबानने नमवले आहे. टोलो न्यूजनुसार, देशाचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सत्ता हस्तांतरणानंतर देश सोडला आहे. ते ताजिकिस्तानला रवाना झाले आहेत.

100 पेक्षा जास्त दिवसांच्या संघर्षानंतर तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. काबूल ताब्यात घेतल्यानंतर असे मानले जात होते की, घनी सरकारने तालिबानपुढे शरणागती पत्करली आहे. यानंतर सत्ता सोपवण्याची संपूर्ण प्रक्रिया रविवारी पार पडली. यापूर्वी तालिबानच्या वतीने असे म्हटले होते की, त्यांना शांततेच्या मार्गाने चर्चेद्वारे तोडगा हवा आहे. देशातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही.

तालिबानचा क्रमांक दोनचा नेता मुल्ला बरादर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्याशी सत्ता हस्तांतरणासाठी बोलणी करण्यासाठी आला होता. असे सांगितले जात आहे की, अली अहमद जलाली हे अफगाणिस्तानचे पुढील राष्ट्रपती असू शकतात.

एएफपी वृत्तसंस्थेनुसार, तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ‘तालिबानला अफगाणिस्तानमध्ये पुढील काही दिवसांत शांततेने सत्ता हस्तांतरित करायची आहे.’

काबूलचा पाडाव झाल्यानंतर अफगाणिस्तानातून तालिबानच्या भीतीने मोठ्या संख्येने नागरिकांनी पलायन सुरू केले आहे.

तालिबानी फौज कलाकन, काराबाग आणि पगमन जिल्ह्यात आहेत. अतिरेक्यांनी यापूर्वी जलालाबादवर कब्जा केला होता. काबुलमध्ये मधून मधून गोळीबाराचा आवाजात येत होता. तालिबानने काबूलला लष्करी कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते. तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते शांततेने सत्ता हस्तांतरणाची वाट पाहत आहेत.

तालिबानने म्हटले की, “कोणाच्याही जिवाची, मालमत्तेची, सन्मानाची हानी होणार नाही आणि काबूलच्या नागरिकांच्या जिवाला धोका होणार नाही.” काबूलव्यतिरिक्त, जलालाबाद हे एकमेव मोठे शहर होते जे तालिबानच्या ताब्यातून वाचलेले होते. हे शहर पाकिस्तानच्या मुख्य सीमेजवळ आहे.

Afghanistan crisis President Ashraf Ghani has left the country, reports says

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात