पेट्रोल अन् डिझेल विसरा : आता पाण्यावर धावणार तुमची कार, पीएम मोदींकडून राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा

PM Modi announces National Hydrogen Mission for Energy Security

National Hydrogen Mission : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी भारतात ऊर्जेचा पुरेसा साठा आणि सुरक्षा लक्ष्ये वाढवण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याची घोषणा केली. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी ऊर्जा स्वातंत्र्याच्या गरजेवर भर दिला आणि भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. PM Modi announces National Hydrogen Mission for Energy Security


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी भारतात ऊर्जेचा पुरेसा साठा आणि सुरक्षा लक्ष्ये वाढवण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याची घोषणा केली. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी ऊर्जा स्वातंत्र्याच्या गरजेवर भर दिला आणि भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

100 लाख कोटींची महत्त्वाकांक्षी योजना

ते म्हणाले की, आज देशात होत असलेल्या सर्व उपक्रमांपैकी जो भारताला मोठी झेप घेण्यास मदत करेल, तो म्हणजे ग्रीन हायड्रोजनचे क्षेत्र आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, राष्ट्रध्वजाखाली मी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा करत आहे. भारतीय स्वातंत्र्याची 100 वर्षे होण्यापूर्वी ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र होण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी लागेल, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगत मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लवकरच 100 लाख कोटी रुपयांची गतिशक्ती योजना सुरू करण्याची घोषणा केली.

पाण्यावर कशी धावणार गाडी?

सध्या भारतात हायड्रोजन वायू बनवण्यासाठी दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते. यापैकी एका पद्धतीमध्ये पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून हायड्रोजन वेगळे केले जाते. म्हणजेच पाण्याच्या मदतीने बनवलेल्या हायड्रोडॉनने कार चालवता येतील. तथापि, ही पद्धत केवळ त्या कारसाठीच शक्य होईल, ज्या हायड्रोजन गॅस इंधनाचा वापर करू शकतात. इतर मार्गांनी नैसर्गिक वायूचे हायड्रोजन आणि कार्बनमध्ये विभाजन होते. यातून मिळणारे हायड्रोजन इंधन म्हणून वापरले जाते.

भारताला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याची घोषणा

प्रधानमंत्री गतीशक्ती- राष्ट्रीय मास्टर प्लॅन औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासह विमानतळ, नवीन रस्ते आणि रेल्वे योजनांसह वाहतूक व्यवस्था सुधारेल. यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. 2047 पर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.

75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत क्षेत्राकडे भारताला एक समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. गतिशक्ती – राष्ट्रीय मास्टर प्लॅन योजना लवकरच या दिशेने सुरू केली जाईल. 100 लाख कोटी रुपयांहून अधिक गतिशक्ती-राष्ट्रीय मास्टर प्लॅनमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासास मदत होईल.

मोदी म्हणाले की, देशाला ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 12 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. साहजिकच, भारत आपल्या एकूण पेट्रोलियम आणि इतर ऊर्जेच्या गरजांपैकी सुमारे 85 टक्के आयात करतो. दुसरीकडे, नैसर्गिक वायूच्या बाबतीत एकूण गरजेच्या निम्मा पुरवठा परदेशातून होतो.

PM Modi announces National Hydrogen Mission for Energy Security

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात