मेक इन इंडियाचे यश : जो देश फक्त आयातच करायचा, तोच आता 3 अब्ज डॉलर्सच्या मोबाइल फोनची निर्यात करतोय

Shifting from imports India now exporting mobile phones worth USD 3 billion says PM Modi Independence day 2021

India now exporting mobile phones worth USD 3 billion : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले की, भारत सात वर्षांपूर्वी 8 अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाइल फोन आयात करत होता आणि आता देश 3 अब्ज डॉलर्स किंमतीच्या या उपकरणांची निर्यात करत आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना जाहीर केली आहे. Shifting from imports India now exporting mobile phones worth USD 3 billion says PM Modi Independence day 2021


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले की, भारत सात वर्षांपूर्वी 8 अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाइल फोन आयात करत होता आणि आता देश 3 अब्ज डॉलर्स किंमतीच्या या उपकरणांची निर्यात करत आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना जाहीर केली आहे.

“इलेक्ट्रॉनिक उत्पादन हे योजनेने आणलेल्या बदलांचे उदाहरण आहे. सात वर्षांपूर्वी आम्ही सुमारे 8 अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाईल फोन आयात करायचो. आता आयात कमी झाली आहे. आज आम्ही 3 अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाईल फोन आयात करत आहोत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने पीएलआय योजनेअंतर्गत 148 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या 16 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, देशात उदारीकरणाच्या धोरणांचा अवलंब केल्याचा परिणाम म्हणजे आज विक्रमी थेट परदेशी गुंतवणूक येत आहे आणि देशातील परकीय चलनसाठादेखील नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. त्यांनी देशातील उद्योगांना ‘जागतिक दर्जाचे उत्पादन’ या ध्येयाने पुढे जाण्याचे आवाहन केले.

जागतिक दर्जाची भारतीय उत्पादने बनवण्यावर भर देताना ते म्हणाले, “आम्ही जे उत्पादन पाठवतो ते केवळ एका कंपनीचे उत्पादन नाही तर ते उत्पादन भारताची ओळख आहे. भारताची प्रतिष्ठा त्या उत्पादनाशी जोडलेली असते. त्यामुळे भारतात बनवलेली उत्पादने अधिक चांगली असावीत.”

स्टार्टअपला प्रत्येक मार्गाने मदत

याव्यतिरिक्त, पंतप्रधान म्हणाले की, देशाचे स्टार्ट-अप वर्ल्ड लीडर बनण्याचे स्वप्न घेऊन पुढे जात आहेत आणि सरकार त्यांच्या मदतीसाठी पूर्ण ताकदीने उभे आहे. ते म्हणाले, “या स्टार्ट-अपसाठी करामध्ये सूट, नियमांचे सरलीकरण किंवा त्यांना आणखी मदत करणे असो, सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे.”

ते म्हणाले की, हे स्टार्ट-अप मोठ्या वेगवान प्रगती करत आहेत. कालचे हे स्टार्ट-अप आजचे युनिकॉर्न बनत आहेत. ते म्हणाले, “हे स्टार्ट-अप जगावर वर्चस्व गाजवण्याचे स्वप्न घेऊन पुढे जात आहेत. ते सर्वोत्कृष्ट असले पाहिजेत, वेगवान राहा, थांबू नका. युनिकॉर्न स्टार्टअप असे आहेत, ज्यांचे मूल्य एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

Shifting from imports India now exporting mobile phones worth USD 3 billion says PM Modi Independence day 2021

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात