विशेष प्रतिनिधी
बार्बाडोस : वसाहतवाद संपून बराच काळ लोटला आहे. असे जरी वाटत असेल तरी बार्बाडोस या देशांमध्ये मात्र वसाहत वाद अजूनही अस्तित्वात होता. मागील 400 वर्षांपासून हा देश वसाहतवादाच्या अस्तित्वाखाली होता. 1966 साली बार्बाडोसने स्वतःला ब्रिटिशांच्या 300 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करून घेतले होते. परंतु या देशाचे प्रमुखपद मात्र ब्रिटनच्या राणी कडेच राहिले होते.
A full stop to the chapter on colonialism: the end of 400 years of colonialism in Barbados
2005 मध्ये या विरोधात त्रिनिदादमधील कॅरेबियन कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये अपील देखील करण्यात आले होते. त्यानंतर 2008 मध्ये देखील असे अपील करण्यात आले होते. पण अनिश्चित काळासाठी हे अपील पुढे ढकलण्यात आले होते. अखेर सोमवारी मध्यरात्री बार्बाडोस ब्रिटनच्या राणीच्या अमला मधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. आणि बार्बाडोसच्या नागरिकांनी एकच जल्लोष केला आहे.
Afghanistan Crisis: भारताकडून NSA स्तरावरील बैठक-चीनचा नकार; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा
बार्बाडोसचे नवीन पंतप्रधान असतील बार्बाडोस रिपब्लिकन चळवळीचे नेते माया मोडले. तर सँड्रा मसान या देशाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष असतील. बार्बाडोसमधील प्रसिध्द कवी विन्स्ट फरेल यांनी ‘वसाहतवादाच्या अध्यायाला फुलस्टॉप’ अशा शब्दांत या घटनेचे वर्णन केले आहे. अवघी 3 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने गेल्या 4 शतकांपासून ब्रिटनच्या दहशतवादाचे अंमल सहन केले आहेत. आता जरी त्यांना स्वातंत्र्य मिळाले असेल तरी आफ्रिका, आशिया, अमेरिका आणि युरोप खंडातील देशांचे मिळून बनलेल्या कॉमनवेल्थचा बार्बाडोस घटक असणार आहे. बार्बाडोसला नव्या मिळालेल्या स्वातंत्र्य मुळे तिथे नव्या प्रशासनाकडून आनंद आणि बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या जातात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App