विशेष प्रतिनिधी
लाहोर : पाकिस्तानच्या डेरा इस्माइल खान भागात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 23 जणांना आपला जीव गमवावा लागला. डेरा इस्माईल खान शहरातील एका पोलीस ठाण्यात हा हल्ला झाला.23 killed in suicide attack in Pakistan police station building collapses
वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, स्फोटामुळे तीन घरं कोसळली असून इमारतींच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबानने घेतली आहे. या दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानच्या धर्तीवर पाकिस्तानात सरकार स्थापन करायचे आहे. या कारणावरून ती सातत्याने सरकारी विभाग आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App