आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मध्यरात्रिपासून जमाबंदी लागू केली आहे. शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील, असे ही जाहीर केले.
ठाकरे यांनी जाहीर केलेले महत्वाचे मुद्दे :
• आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.

• जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.

• महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.

• रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.

• जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील

• अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील

• आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.

• ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.

• चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.

• ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल

• सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद

• अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती

• पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घोषणा :

• आज रात्री 9 वाजेपर्यंतचा कर्फ्यु वाढवला, उद्या सकाळी 5 पर्यंत कर्फ्यु
• महाराष्ट्रात दोन टप्प्यात कर्फ्यु, उद्या सकाळी 5 वाजेपासूनचा कर्फ्यु 31 मार्चपर्यंत वाढवणार
• महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याबाबत विचार सुरु
• ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश सर्वांनी पाळावा
• बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस, भाजीपाला, दूध, फळे, हॉस्पिटल, पोर्टस, मीडिया, फोन ,इंटरनेट सेवा, पेट्रोलियम, ऑइल, वीज वगळता बाकी सर्व बंद कायम
• कुणीही वस्तूंची साठवणूक करुन काळाबाजार करु नये, धार्मिक स्थळांवर भक्तांनी गर्दी करु नये


Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात