अहमद पटेल यांना दणका देण्याची भाजपाची तयारी


गुजरातमध्ये २०१७ मध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा राज्यसभा निवडणुकीदरम्यान पराभव करण्यात भाजपा जवळपास यशस्वी झाला होता. मात्र पटेल यांनी अंतिम क्षणी निसटता विजय मिळवला. त्या पराभवाचा  वचपा काढण्याची तयारी भाजपाने केली असून गुजरातमध्ये कॉँग्रेसची एक जागा हिसकावून घेण्याची तयारी चालवली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही कॉँग्रेसला झटका देण्याची तयारी भाजपाने केली  


विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरातमध्ये २०१७ मध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान हायव्होल्टेज ड्रामा झाला. भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. त्याचा  वचपा काढण्याची तयारी भाजपाने केली असून गुजरातमध्ये कॉँग्रेसची एक जागा हिसकावून घेण्याची तयारी केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही कॉँग्रेसला झटका देण्याची तयारी भाजपाने केली आहे.
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत  १७ राज्यांत ५६ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. भाजपला आपल्या आमदारांच्या संख्याबळावर १४ जागा जिंकता येणार आहेत. परंतु, जास्तीच्या तीन जागा जिंकून काँग्रेसला दणका देण्याची रणनिती भाजपाने आखली आहे.  गुजरातमध्ये भाजपचा जास्तीचा तिसरा उमेदवार जिंकावा यासाठी काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले. भाजपने जवळपास सगळ्या राज्यांत काँग्रेसचे आमदार फोडून आणि विरोधकांच्या मतांत फूट पाडून जागा जिंकता येईल यासाठी एकेक जास्तीचा उमेदवार उभा केला आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थानातही भाजपने जास्तीचा तिसरा उमेदवार उभा केला आहे. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या २२ आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तेथे भाजपचा तिसरा उमेदवार जिंकून येण्याची अपेक्षा आहे. राजस्थानात भाजपला तीनपैकी फक्त एक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, आता काँगे्रसकडून दुसरी जागाही जिंकून घेण्याची तयारी सुरू केली आहे.
लोकसभेत भारतीय जनता पक्षाकडे पूर्ण बहुमत आहे. मात्र,  राज्यसभेत मात्र नाही. त्यामुळे महत्वाच्या विधेयकांवेळी इतर मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागते. नागरिकता सुधारणा कायद्याच्या वेळी भाजपाला इतर पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी रणनिती आखावी  लागली होती. राज्य सभेत २४५ खासदार असतात. बहुमतासाठी १२३ खासदारांची गरज आहे. भाजपाचे ७३ तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे १०२ खासदार आहेत. कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे ६६ खासदार आहेत. इतर पक्षांचेही तेवढेच खासदार आहेत. त्यामुळे भाजपाचा जास्ती जास्त खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे राज्यसभेत बहुमत मिळविण्याच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या होत्या. मात्र, मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पक्षप्रवेशाने आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. मध्य प्रदेशचा फॉर्म्युला इतर राज्यांतही वापरण्यासाठी भाजपाच्या चाणक्यांनी रणनिती आखली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात