विशेष प्रतिनिधी
मुंबई : लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आहाना कुमारानने नुकताच ई टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेपोटिझम विरूध्द आपले मत व्यक्त केले आहे. अहाना म्हणते की, दरवेळी एखाद्या भूमिकेसाठी ऑडिशन्स घेतल्या जातात. नंतर त्याच भूमिकेसाठी ऑडिशन न घेता स्टार किड्सना कास्ट केले जाते. जर तुम्हाला स्टार किड्सना घ्यायचा होते तर आधी ऑडिशन का घेता? असे तिचे म्हणणे आहे.
What Lipstick Under My Burqa Fame Actress Ahana Kumaran Says About Nepotism In Bollywood
आहानाने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. जरी ती लीड अॅक्ट्रेस म्हणून कोणत्याही चित्रपटामुळे झळकली नसली तरी तिचे चाहते मात्र भरपूर आहेत.
नेपोटिझम बद्दल बोलताना आहाना म्हणते की, मी इतके काम केले आहे तरी लोक माझ्याकडून ऑडिशन्स घेतात. पण मला या गोष्टीचा कोणताही त्रास नाही. कारण मला ऑडिशन द्यायला आवडते. कारण तीच एक योग्य प्रोसेस आहे.
Nepotistic करण जोहरवर भारतीय हवाई दलाचा निशाणा
आहाना जेव्हा 15 वर्षांची होती, तेव्हा तिने पृथ्वी थिएटरमध्ये एका वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App