WACTH : वाघ असला म्हणून काय झालं! हा Viral Video ठरतोय खास

अपने घर मे हर कोई शेर होता है… असं हिंदीतलं एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याचीच प्रचिती येणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आहे एका वाघाचा आणि एका बदकाचा. एका लहानशा डबक्यात हा वाघ आणि बदक आहे. बदक वाघाला चांगलाच त्रास देत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. वाघ अनेकदा बदकावर हल्ल्याचा प्रयत्न करतो. पण बदक लगेच पाण्यात डुबकी मारतो आणि गायब होतो. शेवटी पाण्यात बदकाचं वर्चस्व ना. शेवटी वाघाला काही तो बदक हाती लागत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र तो कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. Viral Video of tiger and duck

हेही वाचा –