विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाहुबली फेम दिग्दर्शक एस एस राजामौली हे भारतातील एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. बाहुबली सारखा भव्य दिव्य सिनेमा त्यांनी बनवला आणि रेकॉर्डवर रेकॉर्ड प्रस्थापित केले. या चित्रपटात अभिनेता प्रभास, अभिनेत्री अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसले होते. तर एस एस राजामौली यांचा RRR हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. काल या सिनेमाचा ट्रेलर काल रिलीज करण्यात आला आहे. ज्युनियर एनटीआर, राम,चरण, अजय देवगण, आलिया भट्ट अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
The trailer of SS Rajamouli’s RRR movie has been released
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ब्रिटिश काळातील घटना दाखवण्यात आल्या आल्या आहेत. या ट्रेलर मध्ये सुरुवातीला एक ब्रिटिश अधिकारी एका लहान मुलीला जबरदस्तीने घेऊन जातात दिसून येताहेत. आणि इथे एन्ट्री होते आपल्या हिरोची, ज्युनिअर एनटीआरची. अतिशय तुफान अॅक्शन सीन मधून त्याची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. ब्रिटिशांसाठी पोलीस अधिकारी म्हणून काम करताना ट्रेलरमध्ये राम चरण दिसत आहे. एनटीआरच्या या ब्रिटिशांच्या विरुद्धच्या वागणुकीला विरोध करताना तो दिसून येत आहे. आणि योगायोग म्हणजे हे दोघे लहानपणीचा मित्र असतात. पुन्हा हे दोघे ब्रिटिश राजवटी विरूद्ध लढण्यासाठी एकत्र येतात. या पुर्ण ट्रेलरमध्ये अजय देवगन देखील एका प्रमुख भूमिकेत दिसून येतोय.
RRR मधील १५ मिनिटांच्या रोलसाठी आलीयाने केली कोटींची मागणी
चित्रपटाच्या ट्रेलरवरून साफ झळकते की, व्हीएफएक्सचे काम अतिशय उत्कृष्ट झालेले आहे. बाहुबली प्रमाणेच हा चित्रपट देखील एक प्रॉमिसिंग चित्रपट वाटत आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App