
विशेष प्रतिनिधी
मुबंई : आनंद एल राय यांचा अतरंगी रे हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार, सारा अली खान, धनुष यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. आणि हा ट्रेलर नावा प्रमाणे एक नंबर अतरंगी नक्कीच आहे. वेडेपणा, पागलपन, मस्ती, धम्माल, क्रेझिनेस ने भरलेला हा ट्रेलर नक्कीच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाचा खजिना असणार आहे हे मात्र नक्की.
The trailer of Anand L. Rai’s movie Atarangi Re has been released
सूर्यवंशी चित्रपटातील अभिनयासाठी विश्वास नांगरे-पाटील हेच माझे प्रेरणास्थान : अक्षय कुमार
जिद्दी, अतरंगी मुलगी सारा अली खान. तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यासाठी तिच्या घरचे एका मुलाला जबरदस्ती पळवून आणतात. तो मुलगा तमिळ असतो. तो मुलगा म्हणजे धनुष. या दोघांचे लग्न होते. तेथून हे दोघेजण धनुषच्या नेटिव्ह प्लेस तामिळनाडूला जातात. दोघेजण ठरवतात की दोघांनाही हे लग्न नको आहे तर आपापला मार्ग धरावा. या सर्व जर्नी मध्ये दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. अश्या कथे भोवती फिरणारा हा चित्रपट असणार आहे असे या ट्रेलर वरून दिसते आहे. या चित्रपटाला संगीत ए आर रेहमान यांनी दिले आहे. 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
The trailer of Anand L. Rai’s movie Atarangi Re has been released
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसचा कचरा आम्हाला घ्यायचा नाही अन्यथा संध्याकाळपर्यंत २५ आमदार आपमध्ये येतील, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल
- शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शरद पवार नाराज; साताऱ्यात जाऊन घेतली राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाडाझडती!!
- कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
- यमुना एक्स्प्रेस वेला अटलबिहारी वाजपेयींचे नाव दिले जाण्याची शक्यता, नामांतर योगी सरकारच्या विचाराधीन