नुकतीच या शोमध्ये सोनाली कुलकर्णी , रवि किशन आणि सचिन खेडकर यांनी हजेरी लावली. The Kapil Sharma Show: ‘Why don’t you speak Marathi?’ ; Kapil was narrated by Sonali Kulkarni
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शो ‘द कपिल शर्मा शो ‘ला नेहमी प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. कपिल शर्मा शो मध्ये कपिल सोबत भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकर हे कलाकार देखील या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात.नेहमी या शो मध्ये नवनवीन सेलिब्रिटी येत असतात.नुकतीच या शोमध्ये सोनाली कुलकर्णी , रवि किशन आणि सचिन खेडकर यांनी हजेरी लावली. यावेळी कपिलला ‘मराठी का बोलत नाही?’ असं विचारत सोनालीने सुनावलं.
‘द कपिल शर्मा शो’ च्या एका एपिसोडचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. दरम्यान या व्हिडीओमध्ये कपिल शोमध्ये आलेल्या पाहूण्यांचे स्वागत करत होता.यावेळी सोनाली कपिलला म्हणाली की , ‘तु फक्त हिंदी इंग्रजीमध्ये बोलणार का? मराठीमध्ये पण बोलं’ सोनालीचं हे बोलणं ऐकल्यानंतर कपिल एक-दोन वाक्य मराठी भाषेत बोलला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App