वृत्तसंस्था
मुंबई : छोट्या पडद्यावरून घराघरात पोचलेले अभिनेते स्वप्नील जोशी-श्रेयस तळपदे हे सर्वात अधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत. स्वप्नील जोशीची नव्याने आलेली ‘तू तेव्हा तशी आणि श्रेयश तळपदेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिका गाजत आहेत. हे कलाकार चित्रपटांप्रमाणेच छोट्या पडद्यावरही प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. सोबतच हे दोन्ही अभिनेते मराठी मालिकांमधील सध्याचे सर्वात जास्त मानधन घेणारे ठरले आहेत. छोट्या पडद्यावर अनेक मराठी मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. Swapnil Joshi-Shreyas Talpade became an honorary hero : How much do they charge for an episode?
सातत्याने येणारे नवीन विषय, प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. त्यामुळे मालिकांचा प्रेक्षकवर्ग वाढलेला दिसत आहे. अशातच अनेक मोठमोठे कलाकार पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवताना दिसून येत आहेत. आणि यामध्ये त्यांना यशदेखील मिळत आहे. काही महिन्यांनपूर्वी झी मराठीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सुरु झाली आहे.
या मालिकेने फारच कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला आहे. मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री आणि छोट्या परीचा गोड अभिनय यामुळे मालिका सतत चर्चेत असते. या मालिकेतून श्रेयश तळपदेने अनेक वर्षांनंतर मालिकांमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यांनतर आता झी मराठीवर आणखी एक मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचं नाव आहे ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेनेसुद्धा अल्पवधीतच प्रेक्षकांवर आपली पकड निर्माण केली आहे. जबाबदारी आणि कर्तव्य यामध्ये राहून गेलेल्या प्रेमाची ही गोष्ट आहे. या मालिकेतून स्वप्नील जोशीने कित्येक वर्षांनंतर मालिकेत पुनरागमन केलं आहे.
मराठी मालिकांमधील सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते- ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, श्रेयश तळपदे आणि स्वप्नील जोशी हे मराठी मालिकांमधील सध्याचे सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते ठरले आहेत.मराठी सिरियल्सने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. श्रेयश तळपदे प्रत्येक एपिसोडसाठी ४० ते ४५ हजार रुपये मानधन घेतो. तर स्वप्नील जोशी एका एपिसोडसाठी तब्बल ६० ते ७० हजार रुपये मानधन घेतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App