MARATHI SERIAL : रात्रीस खेळ चाले मालिकेमधून ‘शेवंता’ अपुर्वा नेमळेकरची माघार ; चॅनलसह प्रोडक्शन हाऊसवर गंभीर आरोप ; पहा फेसबुक पोस्ट


 • रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिसऱ्या हंगामाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती.
 • या मालिकेनं अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकरचीही नवी ओळख निर्माण केली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई:  ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेने आपल्या तीन भागांच्या आजवरच्या प्रवासात बऱ्याच कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचं काम केलं आहे. या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने यापुढे मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.अपुर्वाने आपण मालिका सोडत असल्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अपुर्वाने आपल्या फेसबूक पेजवर आपली बाजू मांडतं प्रोडक्शन हाऊससह चॅनलवरही गंभीर आरोप केले आहेत. शेवंता म्हणून आपल्याला मिळालेली ओळख आणि त्यानंतर प्रेक्षकांशी जोडलेलं नात हे मला खूप समाधान देऊन गेलं. परंतू ज्या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं, त्यावरुन निगेटीव्ह कमेंट्स सहन केल्या…त्याच वजनावरुन ज्येष्ठ कलाकारांनी आणि काही नवख्यांनी माझं विडंबन करुन खिल्ली उडवल्याचं अपुर्वाने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अपूर्वाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहीले, ‘शेवंता बस नाम ही काफी है, पण कधी कधी फक्त नाव पुरेस नसतं. शेवंता म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका साकारताना मजा आली आणि समाधानही वाटलं.’  पुढे पोस्टमध्ये अपूर्वाने लिहीले,  ही मालिका सोडण्याचा निर्णय मला का घ्यावा लागला? असं मला प्रेक्षक विचारत होते. त्यामुळे माझी वैयक्तिक जबाबदारी आहे की मी मालिका का सोडली हे प्रेक्षकांना सांगावे.’

काय म्हणाली शैवंता ?

 • आपल्या फेसबूक पोस्टमध्ये अपुर्वाने आपल्याविरुद्ध जिव्हारी लागणाऱ्या काही कमेंट्स केल्या गेल्याचं म्हटलं आहे.
 • याचसोबत सावंतवाडीत शुट सुरु असताना मी मुंबईवरुन १२ तासांचा प्रवास करुन जायचे.
 • परंतू मला बोलावून नंतर १ दिवस शुट करुन पुढचे ३-४ दिवस काहीच काम नसायचं.
 • ज्यात माझा अमुल्य वेळ वाया जात होता असंही अपुर्वाने म्हटलं आहे.
 • तिसऱ्या सिझनसाठी प्रोडक्शन हाऊसकडून अपुर्वाला ५-६ दिवसांसाठी तुझी गरज लागणार आहे असं सांगण्यात आल्यानंतर अपुर्वाने याला नकार दिला.
 • यानंतर प्रोडक्शन हाऊसने तिला आणखी एक शो देण्याचं आश्वासन दिलं.
 • परंतू याला बराच कालावधी उलटून गेल्यानंतरही हे आश्वासन पाळण्यात आलेलं नसल्याचा आरोप अपुर्वाने केला आहे.
 • याचसोबत झी युवा वाहिनीवरील एका मालिकेच्या मानधनाचा चेक अद्याप मिळालेला नसल्याचं म्हणत अपुर्वाने या प्रकरणात आपलं आर्थिक नुकसान होत असल्याचं म्हटलं आहे.
 • चॅनलशी प्रामाणिक राहूनही आपल्या कष्टाची जिथे अवहेलना होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर अशा ठिकाणी काम करणं आपल्या तत्वात बसत नसल्याचं सांगत अपुर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘Shevanta’ from the series ‘Ratis Khel Chale’

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण