विशेष प्रतिनिधी
मुंबई: ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेने आपल्या तीन भागांच्या आजवरच्या प्रवासात बऱ्याच कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचं काम केलं आहे. या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने यापुढे मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.अपुर्वाने आपण मालिका सोडत असल्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अपुर्वाने आपल्या फेसबूक पेजवर आपली बाजू मांडतं प्रोडक्शन हाऊससह चॅनलवरही गंभीर आरोप केले आहेत. शेवंता म्हणून आपल्याला मिळालेली ओळख आणि त्यानंतर प्रेक्षकांशी जोडलेलं नात हे मला खूप समाधान देऊन गेलं. परंतू ज्या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं, त्यावरुन निगेटीव्ह कमेंट्स सहन केल्या…त्याच वजनावरुन ज्येष्ठ कलाकारांनी आणि काही नवख्यांनी माझं विडंबन करुन खिल्ली उडवल्याचं अपुर्वाने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)
A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)
अपूर्वाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहीले, ‘शेवंता बस नाम ही काफी है, पण कधी कधी फक्त नाव पुरेस नसतं. शेवंता म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका साकारताना मजा आली आणि समाधानही वाटलं.’ पुढे पोस्टमध्ये अपूर्वाने लिहीले, ही मालिका सोडण्याचा निर्णय मला का घ्यावा लागला? असं मला प्रेक्षक विचारत होते. त्यामुळे माझी वैयक्तिक जबाबदारी आहे की मी मालिका का सोडली हे प्रेक्षकांना सांगावे.’
काय म्हणाली शैवंता ?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App