विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता विकी कौशल हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे. आपल्या मोजक्या चित्रपटातून त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याची झलक वेळोवेळी दाखवली आहे.
Sardar Udham Singh; Best Social Message Movies, Forbes Magazine Announcement
अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सरदार उधम सिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतीय समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली होतीच. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील या चित्रपटाने चांगलेच नाव मिळाले होते.
आता फोर्ब्ज मॅग्झिनने ह्या चित्रपटाची सर्वात उत्कृष्ट सोशल मॅसेज देणारा चित्रपट म्हणून सरदार उधम सिंग या चित्रपटाची निवड केली आहे. त्यांनी आपल्या ऑफिशिअल पेजवर या चित्रपटाबद्दल हा मेसेज दिला आहे. विकीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही बातमी शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
SARDAR UDHAM SINGH : ‘सरदार उधम’ चित्रपट ब्रिटिशांबद्दल द्वेष पसरवणारा;अनपेक्षित कारण देत ऑस्करच्या यादीतून वगळलं ; भारतीय संतापले
जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये निष्पाप हजारो लोकांचा बळी गेला होता. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी सरदार उधम सिंग यांनी इंग्लंडमध्ये जाऊन संबंधित अधिकारयांचा खून केला होता. या घटनेवर आधारित हा सिनेमा आहे.
मसान, मनमर्झिया, सरदार उधम सिंग, भूत, राझी अशा चित्रपटांमधून त्याने आपले मनोरंजन केलेच आहे. त्याच बरोबर आपल्या सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्समुळे तो नेहमीच चर्चेत राहिलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App