अभिनेत्री सारा अली खानने घेतले केदारनाथचे दर्शन; जान्हवी कापूरसुद्धा होती सोबत; हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच केदारनाथ मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या सोबत जान्हवी कपूर सुद्धा होती. या घटनेमुळे हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. Sara ali khan visited kedarnath temple along with janhavi kapur

सारने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर साराने हे फोटो काढले आहेत. यावेळी सारासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर असल्याचे दिसत आहे. सारने बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी काही फोटो हे केदारनाथचा तिचा प्रवास दाखवत आहेत. तर काही फोटोंमध्ये ती आणि जान्हवी हिमालयासमोर पोज देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत ‘जिथे सुरुवात झाली तिथे परत’, अशा आशयाचे कॅप्शन साराने दिले आहे. साराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.



सारा आणि जान्हवी कपूर या दोघांनी रणवीर सिंहचा ‘द बिग पिक्च’ या शोमध्ये हजेरी लावली आहे. साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट गेल्यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होतो. तर, काही दिवसांपूर्वी सारा ‘अतरंगी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धानूष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Sara ali khan visited kedarnath temple along with janhavi kapur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात