gayle

WATCH | युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा आयपीएलमध्ये मोठा विक्रम

शेर कभी बुढा नही होता असं म्हटलं जातं… आता ही म्हण कुणावर तंतोतंत लागू होत असेल तर तो आहे आयपीएलमध्ये षटकारांचा पाऊस पाडणारा द युनिव्हर्सल बॉस म्हणजे खुद्द ख्रिस गेल (chris gayle). कारण वयाच्या 41 व्या वर्षीही त्याची फलंदाजी आणि एकूणच मैदानावरचा वावर थक्क करणारा असाच आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्लस सामन्यात गेलनं 40 धावांची खेळी केली. यात दोन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या षटकारांसह त्यानं एक खास विक्रम पूर्ण केला. तो विक्रम म्हणजे आयपीएलमध्ये 350 षटकारांचा. विशेष म्हणजे संपूर्ण टी 20 कारकीरर्दीत त्यानं 1000 षटकारांचा टप्पा ओलांडलेला आहे. Record of Punjab Kings batsman chris gayle in IPL

 

हेही वाचा