नोरा फतेही (Nora Fatehi ) आता कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर तिने स्वतःला घरात क्वारंटाईन केले आहे. Nora Fatehi also contracted corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई: नोरा फतेहीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह: कोरोनाने चित्रपटसृष्टीत कहर केला आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा बरी झाल्यानंतर आता नोरा फतेहीला कोरोना झाला आहे. नोराच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली आहे आणि सांगितले की नोरा सध्या क्वारंटाईनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
नोराच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले की, “नोरा फतेहीच्या वतीने मला कळवायचे आहे की नोराला 28 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. नोरा फतेही नियमांचे पालन करत आहे.
ते फोटो आधीचे!
प्रवक्त्याने आपल्या विधानात असेही स्पष्ट केले की, नोरा फतेहीचे जे फोटो सोशल मीडियावर 28 डिसेंबरचे असल्याचे सांगून व्हायरल होत आहेत, ते प्रत्यक्षात पूर्वीच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, ‘अलीकडे नोरा कुठेही घराबाहेर पडलेली नाही. अशा परिस्थितीत या फोटोंकडे दुर्लक्ष करावे, अशी विनंती आहे.’
नोराने दिली माहिती
नोरा फतेहीने स्वतःची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि लिहिले की, ‘कोव्हिडचा माझ्यावर वाईट परिणाम झाला आहे. मी गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या सूचनेनुसार बेडवरच पडून आहे. तसेच सुरक्षित रहा आणि मास्क घाला. कोव्हिडचा प्रसार झपाट्याने होत आहे आणि लोकांना त्याचा वेगवेगळ्या प्रकारे त्रास होऊ शकतो.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App