कालीचरण अटकेवरून छत्तीसगड – मध्य प्रदेशच्या राज्यकर्त्यांमध्ये भांडण जुंपले!!


वृत्तसंस्था

भोपाळ : महात्मा गांधींविषयी शेरेबाजी करणाऱ्या कालीचरण महाराजांना छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन अटक केल्यानंतर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या राज्यकर्त्यांमध्ये भांडण जुंपले आहे. Chhattisgarh-Madhya Pradesh rulers quarrel over Kalicharan arrest !!

छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना न कळवता प्रोटोकॉल तोडून कालीचरण महाराजांना अटक केली, असा आरोप मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. त्यावर कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याविषयी शेरेबाजी केल्याने त्यांना अटक झाली याचा नरोत्तम मिश्रा यांना आनंद झाला की दुःख झाले हे सांगावे, असा पलटवार छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला आहे.

छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन आज पहाटे कालीचरण महाराजांच्या अटकेची कारवाई केली. परंतु मध्य प्रदेश पोलिसांना याची कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. तरीही छत्तीसगड पोलिसांनी कोणताही प्रोटोकॉल तोडला नसल्याचा दावा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला आहे.

Chhattisgarh-Madhya Pradesh rulers quarrel over Kalicharan arrest !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात