आर्यनचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला! एनसीबीच्या ऍण्टी ड्रग एजन्सीकडे गुरुवार पर्यंत आर्यनची कस्टडी


विशेष प्रतिनिधी

मुबंई : सुप्रसिद्ध सिनेस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला नुकताच ड्रग प्रकरणात एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या संदर्भात आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टाकडे पोलिस कोठडीची मागणी केली होती. पण ही मागणी कोर्टाने फेटाळून एनसीबीच्या ऍण्टी ड्रग एजन्सीकडे आर्यनची कस्टडी दिली आहे. एसीबीने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यनची चौकशी करण्यासाठी ही कस्टडी मागितली होती. या हियरिंगसाठी शाहरुख खान आणि गौरी खान दोघेही कोर्टात हजर नव्हते.

No bail for SRK’s son Aryan Khan! Aryan gets custody of Anti drug agency NCB till Thursday

एनसीबीने आर्यन विरूद्ध काही पुरावे कोर्टामध्ये सादर करून आर्यनचा इंटरनॅशनल ड्रग ट्रफिकिंग आणि स्मगलिंग मध्ये सहभाग असू शकतो अशी शक्यता वर्तवली होती आणि या संदर्भात चौकशी करण्यासाठी त्याची कस्टडी मागितली होती.


Aryan Khan Drugs Case: आर्यन खान दोषी सिद्ध झाल्यास इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा, एवढा दंडही भरावा लागू शकतो


या संदर्भात आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी बरेच मुद्दे कोर्टासमोर मांडले होते. व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे कोणालाही दोषी मानलं जाऊ शकत नाही. याआधी देखील रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण यांसारख्या बऱ्याच मोठय़ा कलाकारांना वॉट्सअप चाटवरून संभाव्य आरोपी म्हणून एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. पण त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. म्हणूनच मानशिंदे यांनी आर्यनची बेल मंजूर केली जावी किंवा पोलीस कस्टडी दिली जावी अशी मागणी केली हाेती.

आर्यन यांच्या म्हणण्यानुसार त्याला या पार्टीमध्ये गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. तर त्याच्याकडून पोलिसांनी फक्त एक मोबाईल जप्त केला आहे. त्याच्याकडून कोणतेही ड्रग्ज मिळाले नाहीयेत किंवा त्याला क्रूझवरून अटक करण्यात आले नाहीये असा दावा आर्यनने त्यांच्या वकिलामार्फत केला आहे.

No bail for SRK’s son Aryan Khan! Aryan gets custody of Anti drug agency NCB till Thursday

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण