ना बँड बाजा ना बारात ना आई बाबा ना कन्यादान : दुबईत अडकलेल्या सोनाली कुलकर्णीचे शुभमंगल सावधान!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णी विवाहबंधनात अडकली आहे. सोनालीचा काल ३३वा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्याच दिवशी तिने कुणाल बेनोदकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये सोनालीचा साखरपुडा झाला होता.आता लग्न खरेदीसाठी दुबईला गेलेल्या सोनालीने दुबईमध्येच कुणालसोबत लग्न केलं आहे.हा लग्न सोहळा आगळा वेगळा नक्कीच ठरला आहे. Na band baja na barat: Sonali Kulkarni’s wedding in Dubai

पहा फोटो …

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात .सोनाली कुलकर्णीने दुबईमध्ये कुणाल बेनोदकर याच्यासोबत बांधली लग्नगाठ जून महिन्यात युकेमध्ये दोघांचं लग्न होणार होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी मे महिन्यात अवघ्या 4 जणांच्या उपस्थितीत उरकला लग्नसोहळा सोनाली आणि कुणालचे आई-वडील दुबईमध्ये नसल्याने त्यांनी व्हीडिओ कॉलिंगच्या मार्फत लग्नासोहळ्यात भाग घेतला होता

लग्नाची बातमी सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे.सोनाली तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून एप्रिलमध्ये युकेने भारतीयांसाठी प्रवासाला बंदी केली. क्वारंटाईन, प्रवासाचे निर्बंध तसंच कुटुंबासाठी असणारा धोका, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ रद्द करायचा निर्णय घेतला. जुनचं जुलै होतंय, म्हणलं पुढे ढकलण्याच्या ऐवजी जुलैचं मेमध्ये प्रिपॉन करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ.”

“आम्ही आता एकत्र एका देशात आहोत. पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातील परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही. तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही.”, असंही सोनालीने म्हटलंय.

लग्न किती लवकर आटपलं याबाबत सोनाली लिहीते, “आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला. कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही. आताच शिक्का मोर्तब करून टाकू. त्यानुसार २ दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांमध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदिरात, वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली.

Na band baja na barat: Sonali Kulkarni’s wedding in Dubai