विशेष प्रतिनिधी
मुंबई : अयान मुखर्जी दिग्दर्शित मच अवेटेड ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचे आज मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहेत. मौनी रॉय देखील निगेटिव्ह रोल प्ले करताना दिसणार आहे.
Motion poster of Brahmastra movie starring Ranbir Kapoor and Alia Bhatt has been released
बऱ्याच वर्षांपासून या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. आणि आता फायनली या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 9 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरने या चित्रपटामध्ये शिवा नावाचे कॅरेक्टर प्ले केले आहे. त्याला जन्मतः सुपरनॅचरल पॉवर मिळालेल्या असतात.
आलिया भट्ट विरोधात तक्रार दाखल , हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
या मोशन पिक्चर मध्ये रणबीर कपूरचा एक डायलॉग या चित्रपटाची पाश्र्वभूमी स्पष्ट करतोय. रणबीर कपूर म्हणतोय की, “कुछ चल रहा है दुनिया में, ऐसा कुछ जो नॉर्मल लोगों के समज के बाहर है. कुछ पूराणी शक्तीया है, कुछ अस्त्र है. आणि त्याच्यानंतर आलिया त्याला विचारते की, “ये सब तुम्हे क्यू दिख रहा है? तुम हो कोण शिवा? आणि त्यानंतर रणबीर कपूर हातामध्ये भगवान शंकराचं त्रिशूळ घेऊन उभा असलेला या मोशन पोस्टरमध्ये दिसतोय.
हा एक मॉडर्न मायथॉलॉजीवर वर आधारित सिनेमा असणार आहे असे अयाण मूखर्जीने मोशन पोस्टर रिलीजच्या कार्यक्रमात सांगितले आहे. या चित्रपटाचे एकूण ३ भाग प्रदर्शित होणार आहेत. हा पहिला भाग आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App