विशेष प्रतिनिधी
मुंबई: देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. ज्यामुळे चित्रपटसृष्टीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या नव्या नियमांमुळे बॉलिवूडला सुमारे 400 कोटींचा तोटा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
फेब्रुवारीपासून थिएटर चेन देशाच्या विविध भागात पूर्ण क्षमतेने कार्य करीत असल्याने करमणूक क्षेत्र नुकतेच रूळावर यात असतांना महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन लादण्याचा निर्णय घेतला याचा मोठा फटका सीने सृष्टिला बसणार असल्याचे मत या क्षेत्रातील उद्योजकांनी मांडले आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सूर्यवंशी ३० एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. मात्र महाराष्ट्रात लागू लॉकडाउनचा फटका चित्रपटाच्या कमाईवर होणार असल्याने निर्मात्यांनी ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दिग्दर्शक रोहित शेट्टीचं कौतुक
दरम्यान, चित्रपट ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या एक बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोहित शेट्टीच्या निर्णयाचं स्वागत करत, कौतुकही केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, रोहित शेट्टी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्याचा साहसी आणि अत्यंत कठिण निर्णय घेतला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App