‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’ चित्रपटाचे लेखक सागर सरहदी यांचे निधन

विशेष प्रतिनिधी

मुंबई – ‘नूरी’, ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘दिवाना’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे पटकथा व संवाद लेखक सागर सरहदी (वय ८७) यांचे सोमवारी निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते. Sagar Sarhadi passed away

यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. ‘बाजार’ चित्रपटामधून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. ‘दिवाना’ आणि ‘कहो ना प्यार है’चे संवादलेखन त्यांनी केले होते. २०१९ मध्ये ‘इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्टप फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सागर सरहदी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.सरहदी यांचे खरे नाव गंगासागर तलवार होते. १९३३ मध्ये फाळणीपूर्व ब्रिटिश अमलाखालील भारताच्या नॉर्थ ईस्ट फ्रंटियर (ईशान्य सरहद्द प्रदेश) भागात या तलवार यांचा जन्म झाला. त्या सरहद्द भागाशी स्वतःची ओळख, नाळ जपण्यासाठी पुढे त्यांनी स्वतःचे नाव सागर सरहदी असे बदलले. भारत-पाक फाळणीनंतर सुरू सागर सरहदी यांचे कुटुंब दिल्लीत आले. त्यांनी सुरुवातीला उर्दू कथा लिहिण्यास सुरुवात केली. १९७० मध्ये सरहदी यांनी प्रथम ‘पत्नी’ या चित्रपटाच्या लेखनाचे काम केले.

Sagar Sarhadi passed away

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*