विशेष प्रतिनिधी
मुबंई : कंगना राणावतचा नुकताच थलाइवी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सवर सुद्धा हा सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांकडूनही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याबद्दल कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक ग्रॅटिट्यूड पोस्ट शेअर केली आहे. तीने या पोस्ट मध्ये आपल्या सगळ्या टीमचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे तिने बॉलीवूड माफियाला देखील या पोस्टमध्ये टार्गेट केले आहे. बॉलीवूड माफिया म्हणजे करण जोहर हा नेपोटिझमचा बादशाह आहे असं तिचं म्हणणं आहे.
Kangana ranaut attacks bollywood for not supporting her film Thalaivii
मागे कंगनाचा मणिकर्णिका हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या वेळी देखील कंगनाने आख्ख्या बॉलीवूडला सिनेमाला चांगला प्रतिसाद न दिल्याबद्दल आणि सपोर्ट न केल्याबद्दल टार्गेट केले होते. आणि यावेळी देखील असेच झाले आहे. थलाइवी या सिनेमाला सर्वक्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळत असताना, बॉलीवूडमधील बॉलीवूड माफिया आणि त्यांच्या गँगने माझ्या चित्रपटाला योग्य तो सपोर्ट केला नाही, असे तिचे म्हणणे आहे. तशी एक पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर देखील केली आहे.
रजत अरोरानी ‘थलाइवी’ चा सिक्वल येणार असल्याचे केले जाहीर
थलाईवी हा सिनेमा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री डॉ. जे जयललिता यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये कंगनाने जयललिता यांचे कॅरेक्टर प्ले केले आहे. जयललिता हे नाव एक प्रभावशाली नाव आहे. दहावी बोर्डात येण्यापासून ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा संघर्ष आणि प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. तमिळनाडूमधील सिनेसृष्टीवर त्यांनी एकेकाळी आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने राज्य केले होते. अभिनय क्षेत्र ते राजकारण हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास या सिनेमामध्ये दाखविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App