इरफान खान : यांचा ‘मर्डर ऑन थर्ड फ्लोअर ३०२’ हा चित्रपट १४ वर्षांनी होणार प्रदर्शित, ३१ डिसेंमर २०२१ रोजी झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता इरफान खान हे भारतीय चित्रपट सृष्टीला लाभलेला सर्वात अमूल्य खजिना होता असं म्हणायला हरकत नाही. अभिनय, डोळ्यातील इंटेन्स भाव, डायलॉग डीलिव्हरी मधील बाप माणूस म्हणजे इरफान खान. दुर्दैवाने त्यांना कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. आपल्या कमी कालावधीच्या करियरमध्ये देखील त्यांनी उत्तमोत्तम सिनेमात उत्कृष्ट अभिनय करून आपले स्वतःचे एक वेगळे स्थान चित्रपट सृष्टीत तयार केले होते.

Irfan Khan’s ‘Murder on Third Floor 302’ will be released after 14 years, on 31st December 2021 on Zee5 OTT platform

इरफान खान जेव्हा जिवंत होते, तेव्हा त्यांनी बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण केले होते. पण काही कारणाने हे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नव्हते. आता असाच एक चित्रपट 14 वर्षांनंतर प्रदर्शित होणार आहे. ‘मर्डर ऑन थर्ड फ्लोअर 302’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नवनीत बाज सैनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे.


इरफान खानच्या द लंचबॉक्स सिनेमाला आठ वर्ष पुर्ण, नवाजुद्दीन सिद्दीकीने दिला आठवणींना उजाळा


या चित्रपटामध्ये इरफान खान यांच्यासोबत रणवीर शोरे, लकी अली, दीपक शॉ हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 31 डिसेंबर 2021 रोजी zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण जेव्हा पट्टायाच्या किनार्यावर सुरू होते. त्या वेळी लोकल थाई क्रू मेंबर्सनी त्यांना जोरदार भरती ओहोटी होणार आहे अशी चेतावणी दिली होती. त्यानंतर इरफान खान यांच्यासह बाकी कलाकार यांनी तातडीने चित्रीकरण थांबवले होते. त्यावेळी इरफान खान यांच्या सोबत त्यांचा 9 वर्षचा मुलगा बाबील खान देखील होता. अशी आठवण चित्रपटाच्या मेकर्सनी सांगितली आहे.

Irfan Khan’s ‘Murder on Third Floor 302’ will be released after 14 years, on 31st December 2021 on Zee5 OTT platform

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात