विशेष प्रतिनिधी
मुबंई : अभिषेक जैन दिग्दर्शक हम दो हमारे दो हा सिनेमा हॉटस्टार प्रदर्शित झाला आहे. क्रिती सेनॉन, राजकुमार राव, रत्ना पाठक, परेश रावल यांची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा एक कम्प्लिट फॅमिली ड्रामा आहे.
hum do hamare do movie review
सिनेमातील मुख्य कलाकार क्रिती सेनॉन आणि राजकुमार राव दोघेही अनाथ असतात. क्रिती सेनॉनला तिच्या काकांनी सांभाळलेले असते ल. एक कुटुंब असावं, हॅप्पी फॅमिली असावी अशी छोटी स्वप्नं असणारी ती एक साधी मुलगी असते. राजकुमार राव एक सक्सेसफुल बिझनेसमन असतो. स्वतःच्या हिंमतीवर त्यांने आपले आयुष्य उभे केले असते. ते दोघे भेटतात, दोघांमध्ये प्रेम होते, लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि खरी कहाणी येथून सुरू होते.
लग्नासाठी क्रितीची फक्त एकच अपेक्षा असते की मुलाची चांगली फॅमिली असावी. तर राजकुमार राव बनावट आईवडिलांच्या शोधामध्ये निघतो. रत्ना पाठक आणि परेश रावल हे दोघे त्याचे खोटे आईवडील बनण्यास तयार होतात. परेश रावल आणि रत्ना पाठक यांची एक जुनी कहाणी आहे. जेव्हा ते भेटतात तेव्हा त्या दोघांमधील जुनं प्रेम नव्याने पुन्हा बहरू लागते.
सरदार उधम सिंग मुव्ही रिव्ह्यू
एका खोट्या गोष्टीचा आधार घेऊन उभे राहिलेले नाते टिकते का? त्या दोघांचं लग्न होतं का? फॅमिलीबद्दल राजकुमार रावने बोलल्या गोष्टी क्रितीसमोर कशाप्रकारे उघड होतात? हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.
क्रितीच्या सुंदरतेमुळे आणि राजकुमार राव यांच्या डॅशिंग लुकमुळे चित्रपटाचा एक आकर्षक लूक तयार झाला आहे. सोबत रत्ना पाठक आणि परेश रावल या दोघांना चांगलीच स्पर्धा देताना दिसतात.
अभिषेक जैन यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच एक्सप्रिमेंट आहे. कुटुंब, सहानुभूती, रक्ताचे नाते, प्रेमासाठी आसुसलेली माणसे, रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त बनत जाणारी नाती या सर्व कथा त्यांनी अतिशय सुंदर रीतिने चित्रपटांमध्ये मांडल्या आहेत. मधे काही काही क्षणांमध्ये चित्रपट आऊट ऑफ द ट्रॅक जातो. पण रत्ना पाठक आणि परेश रावल या दोघांच्या स्क्रीनवरील प्रेझेन्समुळे प्रेक्षक नक्कीच सुखावून जातात. शेवटची 15-20 मिनिटं अतिशय खराब झालेली आहेत. चित्रपट थोडासा काल्पनिक वाटत असला तरी विषय मात्र चांगला आहे.
बऱ्याच दिवसांच्या बॉलीवूडमध्ये एक फुल फॅमिली ड्रामा बनला आहे. कॉमेडी इमोशन्सने भरलेला हा सिनेमा नक्कीच तुम्ही पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App