विशेष प्रतिनिधी
मुंबई: जर तुम्ही चित्रपटांचे शौकीन असाल तर या आठवड्यात दिवाळीत रिलीज होणारे हे चित्रपट मिस करू नका.
१: सूर्यवंशी: अक्षय कुमार, कटरीना कैफ, अजय देवगण आणि रणवीर सिंग अशी तगडी स्टारकास्ट असलेला रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी नकारात्मक भूमिका साकारली आहे. तर जावेद जाफरी आणि गुलशन ग्रोवर यांसारखे काही दिग्गज कलाकारही यात दिसतील. ॲक्शन आणि मसाला चित्रपट चाहत्यांसाठी हा चित्रपट आहे.
Diwali Blast: Eight films to be released in the coming Diwali
२: मीनाक्षी सुंदरेश्वर: हा चित्रपट नेटफ्लीक्स वर ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात अभिमन्यू दस्सानी आणि सन्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात अभिमन्यू आणि सन्या मल्होत्रा यांची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळेल.
३: अन्नाथे: सुपरस्टार रजनीकांत त्यांची नवीन मास मसाला मूवी 4 नोव्हेंबर रोजी येत आहे. या चित्रपटात नयनतारा आणि कीर्ती सुरेश यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
४: इंटरनल (eternals): मारवल सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील ही सुपर हीरो फिल्म ५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. अवेंजर्सनी थॅनोसवर विजय मिळवल्यानंतर आता नवीन शत्रू येऊन ठेपला आहे. Deviants नावाच्या एलियन रेसला हरवण्यासाठी eternals हा नवा सुपरहिरो ग्रुप एकत्र येणार आहे.
५: एनिमी: प्रसिद्ध दक्षिणात्य स्टार विशाल याचा ‘चक्र’ या हिट चित्रपटानंतर नवीन तमिळ आणि तेलुगू भाषेतील एनिमी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला रिलीज होणार असून यामध्ये मृणालिनी रवी, ममता मोहनदास आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.
६: स्पेंसर: १९९१ या काळातील कथानक या चित्रपटात दाखवले गेले आहे. यामध्ये राजकुमारी डायना आणि राजकुमार चार्ल्स यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट पाच नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.
७: लव हार्ड: निना दोब्रेव, जिमी यंग आणि डेरन बरनेट यांच्या लव्ह ट्रँगलची हि स्टोरी नेटफलिक्सवर ५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.
८: MGR मगन: हा तमिळ भाषेतील चित्रपट डिस्ने+ हॉटस्टार वर ४ नोव्हेंबरला रिलीज होईल. यात एम सासिकुमार, सत्यराज आणि मृणालिनी रवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App