श्वेता-अभिनव प्रकरणावर आज न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुलाची कस्टडी श्वेताकडेच राहणार आहे.Court gives important verdict in Shweta-Abhinav case, Shweta Tiwari gets custody of son Rayansh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली गेल्या अनेक महिन्यांपासून मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी लढत आहेत. अभिनवने श्वेतावर त्याचा मुलगा रियंशला भेटू न देण्याचा आरोप केला होता.
श्वेता-अभिनव प्रकरणावर आज न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुलाची कस्टडी श्वेताकडेच राहणार आहे आणि तिचा पती अभिनव कोहली याला त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी वेळ ठरवून दिली जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर श्वेता तिवारी खूप आनंदी आहे.
श्वेता आपल्याला रेयांशला भेटू देत नाही. ती एक बिझी अभिनेत्री आहे. मुलाला देण्यासाठी तीच्याकड वेळ नाही , अस म्हणत अभिनव ने रेयांशची कस्टडी आपल्याला मिळावी , यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु कोर्टाने त्याची विनंती नाकारत मुलाची कस्टडी श्वेता सोपवली. अर्थात अभिनव कोहली मुलाला भेटू शकणार आहे. रोज अर्धा तास तो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाशी बोलू शकेल. शिवाय आठवड्याच्या शेवटी दोन तास मुलाला श्वेताच्या बिल्डिंगच्या परिसरात भेटू शकेल. मात्र यावेळी श्वेता व तिच्या कुटुंबातील एक व्यक्ती तिथे हजर राहणे गरजेचे असेल.
न्यायालयाच्या निर्णयानंतर श्वेता तिवारीने आपला आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली, ‘मला तेच हवे होते आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मी या निर्णयावर समाधानी आहे. अभिनव गेल्या दोन वर्षात मी जिथे गेले तिथे माझा पाठलाग करायचा. मी जिथे दिल्ली किंवा पुण्यात रियांशसोबत माझा शो करायला जायचे, तिथे तो गोंधळ निर्माण करायचा. हे माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी मानसिकदृष्ट्या त्रासदायक होते. तो इथेच थांबला नाही, कधीकधी तो माझ्या घराच्या दारापर्यंत यायचा.’
श्वेताने १३ जुलै २०१३ रोजी अभिनव कोहली सोबत लग्न केलं होत. त्याआधी तीन वर्ष दोघेही रेलेशनशिप मध्ये होते.२०१६ मध्ये श्वेताने मुलगा रेयांशला जन्म दिला.२०१७ मध्ये अभिनव व श्वेता यांच्यात वाद सुरू झालं. २०१९ मध्ये हे वाद टोकाला पोहचले. तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरू होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App